वृत्तमानस


मनोगत

नमस्कार!
मी पूर्वाश्रमीची शालिनी भगवान मेहेंदळे आणि विवाहनंतरची मानसी माधव मोकाशी. वडिलांची बदलीची नोकरी , त्यामुळे वेगवेगळ्या गावी जाता आलं. वेगवेगळ्या शाळांत शिक्षण झालं.
महाविद्यालयात पदवी घेत असतानाच एका बालकादंबरिकेचा स्वैर अनुवाद करून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. नंतर आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पुणे, मुंबई, पणजी या केंद्रांवर काम करताना विविध माणसं भेटली, विविध अनुभवही आले.
विवाहानंतर ‘सोलापूर तरुण भारत’ मध्ये उपसंपादक म्हणून काम करताना बातम्यांबरोबरच दिवाळी अंक, रविवार व बुधवारची मध्यमा पुरवणी यांचं संपादन करताना अनुभवविश्र्व विस्तारलं.

बाल, महिला यांच्यासाठी लिहितानाच काही सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांनाही हात घातला. वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या प्रोत्साहनामुळे जे लिखाण झालं, त्यातील काही या आंतरजालाद्वारे आपल्यापुढे ठेवत आहे. माझा भाऊ प्रसाद मेहेंदळे याच्यामुळेच हे शक्य होत आहे.
अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या माय मराठीच्या विस्तीर्ण दालनात माझी ही छोटीशी मुशाफिरी. वाचकांच्या मतप्रदर्शनामुळे माझ्या या मुशाफिरीला बळ मिळणार आहे. म्हणून प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

मानसी मोकाशी

माझे लेखन

व्यक्ति परीचय

चंद्रशेखर व्यंकटरमण

मुलाखती

सर्कशीतली माणसं आणि प्राणी