वृत्तमानस

नमस्कार!

मी पूर्वाश्रमीची शालिनी भगवान मेहेंदळे आणि विवाहनंतरची मानसी माधव मोकाशी. वडिलांची बदलीची नोकरी , त्यामुळे वेगवेगळ्या गावी जाता आलं. वेगवेगळ्या शाळांत शिक्षण झालं. महाविद्यालयात पदवी घेत असतानाच एका बालकादंबरिकेचा स्वैर अनुवाद करून लेखनाचा श्रीगणेशा केला होता.

त्यानंतर आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पुणे,मुंबई, पणजी या केंद्रांवर काम करताना विविध माणसं भेटली, विविध अनुभवही आले. विवाहानंतर ‘सोलापूर तरुण भारत’ मध्ये उपसंपादक म्हणून काम करताना बातम्यांबरोबरच दिवाळी अंक, रविवार व बुधवारची मध्यमा पुरवणी यांचं संपादन करताना अनुभवविश्र्व विस्तारलं.

बाल, महिला यांच्यासाठी लिहितानाच काही सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांनाही हात घातला. वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या प्रोत्साहनामुळे जे लिखाण झालं, त्यातील काही या आंतरजालाद्वारे आपल्यापुढे ठेवत आहे.

अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या माय मराठीच्या विस्तीर्ण दालनात माझी ही छोटीशी मुशाफिरी. वाचकांच्या मतप्रदर्शनामुळे माझ्या या मुशाफिरीला बळ मिळणार आहे. म्हणून प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

--मानसी मोकाशी

व्यक्ति परीचय

मुलाखती

बाल साहित्य


संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
editormail

लेखकः मानसी मोकाशी तारीखः Friday 02 December 2022 04:27:28 PM IST