मानस मंथन

नमस्कार!

मी पूर्वाश्रमीची शालिनी भगवान मेहेंदळे आणि विवाहनंतरची मानसी माधव मोकाशी. वडिलांची बदलीची नोकरी , त्यामुळे वेगवेगळ्या गावी जाता आलं. वेगवेगळ्या शाळांत शिक्षण झालं. महाविद्यालयात पदवी घेत असतानाच एका बालकादंबरिकेचा स्वैर अनुवाद करून लेखनाचा श्रीगणेशा केला होता.

त्यानंतर आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पुणे,मुंबई, पणजी या केंद्रांवर काम करताना विविध माणसं भेटली, विविध अनुभवही आले. विवाहानंतर ‘सोलापूर तरुण भारत’ मध्ये उपसंपादक म्हणून काम करताना बातम्यांबरोबरच दिवाळी अंक, रविवार व बुधवारची मध्यमा पुरवणी यांचं संपादन करताना अनुभवविश्र्व विस्तारलं.

बाल, महिला यांच्यासाठी लिहितानाच काही सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांनाही हात घातला. वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या प्रोत्साहनामुळे जे लिखाण झालं, त्यातील काही या आंतरजालाद्वारे आपल्यापुढे ठेवत आहे.

अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या माय मराठीच्या विस्तीर्ण दालनात माझी ही छोटीशी मुशाफिरी. वाचकांच्या मतप्रदर्शनामुळे माझ्या या मुशाफिरीला बळ मिळणार आहे. म्हणून प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

माझ्या लेखनाची अनुक्रमणिका पुढे दिली आहे. लेखांचे जसजसे संगणकीकरण होईल तसतशी ती वाढत जाईल. लेख वाचल्यावर तुमच्या प्रतिक्रिया मला इमेलने जरूर कळवा.

--मानसी मोकाशी

पूर्वी लिहिलेले काही लेख pdf रूपात

सामाजिक आणि राजकीय

श्वान विश्व

कुत्रा हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींकडून मला मिळालेली माहिती पुढे लेख रूपात दिली आहे. या लेखांतील काही माहितीत त्रुटी असण्याची शक्यता आहे. श्वान तज्ञांनी त्या मला जरूर कळवाव्यात.

अल्प चरित्रे

मुलाखती / परिचय

बाल साहित्य

बऱ्याच वर्षांपूर्वी मी लिहिलेली ही बाल-कादंबरिका. मुले अजून आवडीने वाचतात.
पराक्रमी त्रिकूट.

बाल, किशोरांसाठी लिहिलेल्या माझ्या इतर गोष्टी


मुख्यपान Homepage

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही थेट इमेल पाठवू शकत नाही. ई पत्ता वाचून तुम्ही मला ईमेल पाठवू शकता. स्पॅम मेल टाळण्यासाठी ही सावधानता बाळगली आहे. मात्र तुम्ही इमेल करून तुमचे मत मला कळवले तर ते मला नक्कीच आवडेल.
Contact us here:
myemail

लेखकः मानसी मोकाशी